सिल्लोड, (प्रतिनिधी) : सरस्वती विद्यालय तळणी येथे आज भारताच्या माजी पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन व भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसही साजरा करण्यात आला. प्राचार्य अशोक गरुड यांच्या हस्ते दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात कैलास शेजूळ यांनी विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याची, देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी केलेले कार्य, संस्थानांचे विलीनीकरण आणि राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रमेश राजगुरू यांनी केले, आभार प्रदर्शन जाधव यांनी केले. या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. देशाच्या महान नेत्यांच्या कार्याचे स्मरण करून राष्ट्रीय एकता व अखंडतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.














